पुणे : रिक्षा मीटर प्रमाणीकरणावर एकमत

पुणे – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुणे कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांना 22 नोव्हेंबरपासून भाडेदरवाढ लागू केली आहे. दरवाढीनंतर मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करणे आवश्‍यक असते. मात्र, याबाबतच्या दरांवर निर्णय न झाल्याने प्रमाणीकरणाला मंगळवारी (23 नोव्हेंबर) तात्पुरती स्थगिती दिली होती. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि.24) बैठक झाली यामध्ये प्रमाणीकरणाच्या दराबाबत एकमत झाले. त्यामुळे प्रमाणीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
|
मीटर कॅलीब्रेशनबाबत मागील दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या बैठका आणि चर्चांमध्ये एकमत झाले नव्हते. त्यामुळे मीटर प्रमाणीकरणाला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत एकमत झाले असून, याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. मीटर प्रमाणीकरणासाठी 31 जानेवारी 2022 पर्यंतची मुदत कार्यालयाने दिली आहे.

या अनुषंगाने मीटर कॅलीब्रेशनचे सर्वसमावेशक दर निश्‍चित करण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मीटर उत्पादक, दुरुस्ती केंद्र संचालक, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत चर्चा झाली. रिक्षा मीटर प्रमाणाकरणासाठी 550 रुपये हा दर स्टॅंडर्ड मीटर वगळता सर्व मीटर उत्पादक, दुरुस्ती केंद्र संचालक आणि रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहमतीने मान्य केल्याची माहिती कार्यालयाच्या

…तरच भाडे आकारता येणार
मीटर प्रमाणीकरण करून नवीन भाड्याचे सॉफ्टवेअर मीटरमध्ये बसविलेल्या रिक्षाचालकांना आणि नवीन भाडे प्रदर्शित होत आहे, अशा रिक्षाचालकांना प्रवाशांकडून नवीन दराने भाडे आकारता येईल, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.