बनावट नोटा छपाईचे दौंड तालुक्‍यात कनेक्‍शन

दौंड व श्रीगोंदा पोलिसांची संयुक्‍त कारवाई

रावणगाव – दौंड तालुक्‍यालगत असलेल्या श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील बनावट नोटांच्या छपाईचे कनेक्‍शन खडकी (ता. दौंड) येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. श्रीगोंदा व दौंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथील तिघांसह नोटा छपाईचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी सुमित भिमराव शिंदे, अमित भिमराव शिंदे, शिवाजी श्रीपत शिंदे (सर्व रा.खडकी,ता.दौंड) यांना याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतलेले आहे. याबत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी माहिती दिली की, सचिन रघुनाथ आगरकर (वय 30 रा.सुपा ता.पारनेर, जि.अ.नगर) याला मांडणगाव फाटा येथे बुधवार (दि.6) वेरणा गाडीसह (एमएच 25 एनई 85) दोन लाख 83 हजार हजारांच्या बनावट नोटासह अंदाजे साडेसात लाखांच्या ऐवजासह पकडले होते.

त्या अनुशंगाने बारामती येथील श्रीकांत माने व युवराज कांबळे यांना अनुक्रमे भालकेवाडी व खंडोबानगर परिसरातून उचलले असता त्यांच्या माहितीतून खडकी (ता.दौंड) येथील युवराज कांबळे यांचे नातेवाईक सुमित, अमित व शिवाजी शिंदे हे ही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे काही बनावट नोटा व नोटा बनविण्याचे मशीन तसेच संगणक संच, पेपर आदी साहित्य मिळून आले.

ही कारवाई शनिवारी उशिरापर्यंत सुरू होती. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माळी, पोलीस नाईक वयराळ, पोलीस कॉन्स्टेबल संजय खोतकर, अमोल शिंदे, किरण भापकर व रावणगाव पोलिसांनी सहभाग घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.