कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी; भाजपचा धुव्वा

बंगळुरू : कर्नाटकात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला स्थानिक पालिका निवडणुकांत मोठा झटका बसलाय. करोना संक्रमणादरम्यान कर्नाटक राज्यात भाजपला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर विरोधात असलेल्या काँग्रेसने १० नगरपालिकांत झालेल्या निवडणुकीत ७ जागांवर विजय मिळवाल. तर भाजपला केवळ एक जागा आपल्याकडे राखण्यात यश आलं आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी १० पैंकी ७ जागांवर पक्षानं मिळवलेल्या विजयाचं श्रेय नागरिकांना देत आनंद व्यक्त केलाय. या विजयामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येतंय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.