पुणे – गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत. याविरोधात आज काँग्रेसने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पुण्यातही आज अलका चौकात शहर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.
इंधनाच्या किंमती कमी करुन करोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणाऱ्या जनतेला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित केला आहे.