तीस हजार गावांत कॉंग्रेसचे महासंपर्क अभियान

लखनौ – कॉंग्रेस पक्षाने 19 ऑगस्ट पासून उत्तरप्रदेशातील 30 हजार गावांमध्ये आणि शहरांमधील वॉर्डांमध्ये महासंपर्क अभियान राबवण्याची योजना आखली आहे.

या योजनेनुसार कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्या गावांमध्ये व वॉर्डांमध्ये किमान 75 तास राहुन ते तेथे श्रमदान करणार आहेत. प्रियांका गांधी यांच्या सुचनेनुसार हे महासंपर्क अभियान राबवले जाणार आहे.

20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती तेथे सदभावना दिवस म्हणून साजरी केली जाणार असून त्यादिवशी संबंधीत गावातील शेतकरी ज्येष्ठ नागरीक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला जाणार आहे.

मेरा देश मेरा गाव या नावाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. स्थानिक पातळीवरील समस्यांवरही तेथे चर्चा घडवली जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.