…अन् भाजप कार्यकर्त्यांपाठोपाठ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

अहमदाबाद – गुजरात हे राज्य भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या पाठोपाठ आता महापालिका निवडणुकांतही या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.

दरम्यान, आज अहमदाबाद येथे मतमोजणीच्या वेळी वेगळेच चित्र पहायला मिळाले. भाजपच्या उमेदवाराने कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात विजयी आघाडी घेतल्यानंतर चक्क कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचे पहायला मिळाले.

एल डी कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे मतमोजणी सुरू होती. त्यावेळी भाजप उमेदवाराने आघाडी घेतली. तेव्हा त्याच्या समर्थकाने वंदे मातरम आणि जय श्रीराम अशा घोषणा सुरू केल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही त्यांच्या हातात पक्षाचा ध्वज धरत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस जिंदाबादच्याही घोषणा दिल्या.

दरम्यान, आजच्या निकालात भाजपने आपले एकहाती वर्चस्व सिध्द केले असून सहा महापालिकांमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राज्यात तूर्त भाजपला कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.