नवी दिल्ली: देशातील आर्थिक मंदीवरून कॉंग्रेस मोदी सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार आहे. मात्र राहुल गांधी परदेश दौर्यावर रवाना झाले आहेत. ते एका आठवड्यात परत येतील आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंदोलनात सामील होतील, असा अंदाज आहे.
राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार आंदोलनाच्या सर्व योजना तयार करण्यात आल्या असल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत कॉंग्रेस देशभरात 35 पत्रकार परिषद घेणार आहे. याशिवाय 5 ते 15 नोव्हेंबर या काळात देशातील आर्थिक परिस्थितीबाबत निदर्शने करणार आहे.