काँग्रेस देशभरातील गरिबांच्या बँक खात्यांवर ३ लाख ६० हजार रुपये जमा करणार : राहुल गांधींनी दिला शब्द

आसाम : देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींनी देशभरामध्ये सभांचा धडाका सुरु केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आसाम येथील बोकाखाट येथे एका जाहीर सभेस संबोधित केले. यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेद्वारा घोषित करण्यात आलेल्या किमान वेतन योजनेबाबत माहिती देताना पंतप्रधानांवर देखील निशाणा साधला.

ते म्हणाले, “एका बाजूला चौकीदाराच १५ लाख रुपये देण्याचं खोटं आश्वासन आहे तर दुसरीकडे काँग्रेसने दिलेलं खरंखुरं आश्वासन आहे. मी तुम्हाला शब्द देतो की सत्तेत येताच काँग्रेस देशातील २०% सर्वात गरीब असलेल्यांच्या खात्यामध्ये ५ वर्षात ३ लाख ६० हजार रुपये भरेल.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.