पणजी: विधानसभा निवडणूका जवळ आल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलं आहे. गोव्यामध्ये काँग्रेसचे ४ आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेस कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफासियो डायस यांनी असे विधान केले आहे.
आमदार डायस म्हणाले, आपण विरोधी पक्षात असल्याने कुंकळ्ळीच्या बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या पुरवू शकत नाही. त्यामुळे समर्थकांनी पाठिंबा दिल्यास, आपण सुद्धा भाजपात प्रवेश करण्यास तयार आहे. कॉंग्रेसचे चार आमदार त्यांच्या मतदारसंघात होत नसलेल्या विकासकामांमुळे अस्वस्थ आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असे डायस समर्थकांना सांगितले.