कॉंग्रेसची ट्‌विटरवरून संघावर टीका 

नवी दिल्ली – संघाच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांनी मुंबईतल्या न्यायालयात हजेरी लावल्यानंतर कॉंग्रेसने ट्विटरवर संघाबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला. संघाने सातत्याने देशविरोधी कारवायांमध्ये भाग घेतल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. त्या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेसने ट्विटरवरून संघावर टीका केली. “संघ नक्की काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे. संघाने सातत्याने ब्रिटीशांशी निष्ठा राखून देशविरोधी कारवायात भाग घेतला, हिंसाचारास चिथावणी दिली आणि महात्मा गांधींची हत्या केली.’ असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

स्वातंत्र्य चळवळीपासून भारतीयत्वाच्या प्रतिकांनाही संघाने विरोध केला आहे. जेंव्हा स्वातंत्र्य सैनिक ब्रिटीशांशी संघर्ष करत होते. तेंव्हा संघाचे नेते ब्रिटीशांपुढे नमते घेत होते. भारताच्या संकल्पनेला विरोध करणे हेच संघाचे धोरण राहिले आहे, असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.

कॉंग्रेसने या संदेशाबरोबर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा एक मिनिटाचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. संघ सत्याग्रहामध्ये सहभागी होणार नाही असे आदेश डॉ. हेडगेवार यांनी दिले होते. तसेच संघाच्या नेत्यांनी ब्रिटीशांच्या सुरक्षा दलांमध्ये भरती होण्यास प्रोत्साहन दिले होते. त्याचे ब्रिटीशांनी कौतुकच केले होते, असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. संघाने मनुस्मृतीला राज्यघटनेपेक्षा अधिक महत्वाचे मानले असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला.

Leave A Reply

Your email address will not be published.