बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल संघर्ष; तीन कार्यकर्त्यांची हत्या 

कोलकता – पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसा थांबण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा एकदा मुर्शिदाबादच्या डोमकलमध्ये दोन पक्षात हिंसाचार झाला. यामध्ये तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

सूत्रानुसार, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आज सकाळी हिंसाचार उफाळला. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते खैरुद्दीन शेख, सोहेल राणा आणि अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. खैरुद्दीनच्या मुलाने यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालममध्ये आतापर्यंत १० राजकीय कार्यकर्त्यांची हत्या झालेली आहे. याआधी भाजप आणि तृणमूलमध्ये हिंसाचार होत होता. परंतु, आज काँग्रेस आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.