भाजपा सरकारच्या राफेल विमान खरेदी गैरव्यवहारा विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार 

भाजपा प्रणित केंद्र सरकारने राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहाराबाबत पाळलेल्या गुप्ततेच्या विरोधात काँगेस ३० जुलै रोजी मुंबई येथे आंदोलन छेडणार आहे. ३० जुलै रोजी हे आंदोलन मुंबई मधील फॅशन स्ट्रीट पासून सुरु होईल तर आंदोलनाची सांगता आझाद मैदानावर होईल अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी “भाजपा सरकारने राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारांमध्ये मोठा गैरव्यवहार केला असून काँग्रेस सरकारच्या काळात राफेल विमानांची किंमत कमी होती परंतु मोदी सरकारने तो व्यवहार रद्द करत विमानांची चढ्या भवानी खरेदी केली आहे.” असा आरोप केंद्र सरकारवर लावला.
देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत बोलताना “करारामध्ये घालण्यात आलेल्या सुरक्षाविषयक अटींमुळे केंद्र सरकार राफेल विमानांची खरेदी किंमत जाहीर करू शकत नाही” असे स्पष्ट केले होते मात्र सीतारामन यांनी दिलेल्या माहितीवर आक्षेप घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी “करारामध्ये अशा कोणत्याही अटी घालण्यात आल्या नसून केंद्र सरकार सुरक्षेच्या नावाखाली ही माहिती लपवून ठेऊ शकत नाही” असे वक्तव्य केले होते.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाण यांनी “केंद्र सरकार विमानामध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाविषयी निश्चितच गुप्तता बाळगू शकते, परंतु विमानाच्या किंमती गुप्त ठेवणे हे संशयास्पद आहे” असे मत व्यक्त केले. मोदी सरकारने राफेल विमाने ३०० पट चढ्या भावाने खरेदी केली असून काँग्रेसच्या काळात ५२६ कोटींचे एक लढाऊ विमान खरेदी केले जाणार होते मात्र आता तेच विमान १६७० कोटींना खरेदी केले जात आहे असे गंभीर आरोप त्यांनी मोदी सरकारवर केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)