खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने आणि…, प्रल्हाद मोदींच्या टिकेनंतर कॉंग्रेसनेही साधला निशाणा

मुंबई – खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटं गुजरात मॉडेल सगळं खोटं! मोदींची राजकीय इमारतच प्रोपागांडावर उभी आहे. अशी जोरदार टीका कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यावरुन कॉंग्रसेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत म्हणाले की, खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटं गुजरात मॉडेल सगळं खोटं! मोदींची राजकीय इमारतच प्रोपागांडावर उभी आहे. त्यावर भूलून मत दिल्यावर हात रितेच राहणार. मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदीच म्हणाले की मोदींनी कधी चहा विकला नाही. पण स्वतःला चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं!

करोना आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचे आवाहन केले.’ नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आपण लोकशाही राहतो, गुलामगिरीत नाही’, असे म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला आहे. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.