कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव

नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पराभूत झाले आहेत. नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजय मिळविला आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाखांहून घेतल्याने चव्हाण यांना त्याचा फटका बसल्याचे बोलेले जा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अशोक चव्हाण स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र पक्षाचे आदेश आल्यानंतर त्यांनी मैदानात उडी घेतली होती. 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी विजय मिळवला होता. त्यांना 4,93075 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपचे डी. बी. पाटील यांना 4,11,620 मतं मिळाली होती.

दरम्यान, राज्यात कॉंग्रेसचे पतन होण्यामागे वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: कॉंग्रेसच्या उमेदवारांना बसला. नांदेडमध्ये देखील याच “वंचित’ फॅक्‍टरमुळे अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)