पुणे – “मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी किंवा अध्यादेश काढून मराठा समाजाला न्याय द्यावा. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कॉंग्रेस पक्षाने सकारात्मक पुढाकार घ्यावा,’ अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
सारथी या संस्थेच्या स्वायत्तेबाबत व त्याला मिळणाऱ्या निधीबाबत मराठा समाज नाराज आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून तरुण व व्यावसायिक मराठा समाजाला दिली जाणरी मदत अपुरी पडत आहे. या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
तसेच राज्य शासनामार्फत पोलिसांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. ही प्रकिया थांबवावी, अशी मराठा समाजाची मागणी आहे. यासंदर्भात बागवे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.