उत्तरप्रदेश लोकसभा – काँग्रेसकडून तीन उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर

लखनऊ – काँग्रेस पक्षाने सोमवारी उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीसाठी तीन जागेवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने इलाहाबादमध्ये भाजप उमेदवार डाॅक्टर रीता बहुगुणा जोशी याच्यां विरोधात योगेश जोशी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

डुमरियागंजमध्ये डाॅक्टर चंद्रेश उपाध्यय आणि संत कबीरनगर येथून भालचंद्र यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संत कबीरनगरमध्ये पहिल्यांदा परवेज खान यांना काँग्रेसने तिकिट दिले होते, मात्र त्यांच्याऐवजी आता सपा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले भालचंद्र यादव यांना उमेदवारी देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.