नवी दिल्ली – केंद्र सरकार कोरोना फंड जमवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर अधिक टॅक्स लावण्याच्या तयारीत आहे. त्यावरून काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी एका बातमीचा स्क्रिनशाॅट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
‘पंतप्रधानजी जनतेला लूटने सोडा, आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा, आत्मनिर्भर बना, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी केलेलं हे ट्विट काही वेळातच अनेकांनी रिट्विट आणि लाईक केलं आहे.
प्रधानमंत्री जी,
जनता को लूटना छोड़िए,
अपने मित्रों को पैसा देना बंद कीजिए,
आत्मनिर्भर बनिए। pic.twitter.com/aTPWR0jpfj— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 27, 2020