कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी कलम 370 वर भूमिका स्पष्ट करावी

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची मागणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने विरोधी पक्षांनी सरकारच्या निर्णयाला आजपर्यंत विरोधच दर्शवला आहे. दरम्यान, आता कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कलम 370 वर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर अध्यक्षपद सोडणाऱ्या राहुल गांधी यांच्याकडून आपल्याला कोणतीच अपेक्षा नाही परंतु, आता कॉंग्रेसला नवीन अध्यक्ष मिळाला आहे त्यानुसार कॉंग्रेस आणि सोनिया गांधी यांनी कलम 370 वर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांना रणछोडदास असा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे गोवा मुक्‍तीसाठी उशिर झाला असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच कॉंग्रेसला जे 70 वर्षात जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48 तासांत करून दाखवले आणि कलम 370 रद्द केले. दरम्यान, आता या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे परंतू, यावर आपण कोणती भूमिका घ्यावी याच संभ्रमात अजूनही असल्याने ते या निर्णयाला विरोध करत असल्याचे चौहान यांनी यावेळी म्हटले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×