उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष भाजपला टक्कर देऊ शकत नाही – मायावती

साहारनपूर (उत्तर प्रदेश) – बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. देवबंद साहारनपूर येथील सभेत काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना मायावती यांनी, उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाला टक्कर देऊ शकत नाही, कारण उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस कमजोर झाल्याचे त्या म्हणाल्या.

मुस्लिम समुदायाला चेतावणी देत मायावतींनी, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांचे गठबंधनच भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश मध्ये रोखू शकते, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस पक्ष हा आम्ही जिंकलो नाही तरी चालेल, पण गठबंधनला सुद्धा जिंकून द्यायचे नाही, अशा पद्धतीने काँग्रेस वागत असल्याची टीका मायावतींनी केली.

https://twitter.com/ANINewsUP/status/1114806766028644353

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)