लातूरमधून कॉंग्रेसची मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी 

लातूर – लातूर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस पक्षाने पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच मातंग समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे.

मच्छिंद्र कामत हे पुणे येथे मोठे उद्योजक आहेत. त्यांची पावडर कोटींग कंपनी, कामत मसाले, हॉटेल व्यवसाय आदी व्यवसाय आहेत. ते मुळचे कासराळ, ता. उदगीर, जि. लातूर येथील रहिवासी आहेत. ते उच्चशिक्षीत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उदगीर मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्यांना सुमारे 58 हजार मते मिळाली होती. मच्छिंद्र कामत हे उद्योजक म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कामत यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, औद्योगिक क्षेत्रात चांगले काम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.