नवज्योतसिंग सिद्धुच्या पत्नीला कॉंग्रेसने चंदीगड मधून नाकारली उमेदवारी

चंदीगड – नवज्योत सिंग सिद्धु यांच्या पत्नी नवज्योत कौर यांना चंदीगड मतदार संघातून लोकसभेची कॉंग्रेसची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी प्रचारही सुरू केला होता पण कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्या आपली नाराजी लपवू शकल्या नाहींत.

त्या माजी आमदार आहेत. त्यांना यावेळी कॉंग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी अपेक्षित होती. त्या म्हणाल्या की मला जर उमेदवारी मिळाली असती तर मी या ठिकाणी केलेले काम मतदारांपुढे मांडू शकले असते. आपण राजकारणासाठी आपला व्यक्तीगत व्यवसायही सोडून दिल्याचे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्या गायनाकॉलॉजिस्ट म्हणून काम करीत होत्या. पण त्यांनी आपले करीअर सोडून पुर्णवेळ राजकारण सुरू केले आहे.

या जागेवर कॉंग्रेसने पवनकुमार बंसल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी या आधी चार वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली असून केंद्रात ते मंत्रीही होते. चंदीगड मधून नवज्योत कौर यांच्या खेरीज कॉंग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी हेही इच्छुक होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.