काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग

भोपाळ: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर भाजपतर्फे आज मध्यप्रदेशातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या ४ उमेदवारांच्या यादीमध्ये २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा देखील समावेश असून पक्षातर्फे त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान,  साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या उमदेवारीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मालेगाव स्फोटात बळी पडलेल्या युवकाच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यानां उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. त्या म्हणाल्या मी जामिनावर असल्याची काँग्रेसकडून टीका केली जातेय. खरं तर या विषयावर बोलण्यचा काँग्रेसला अधिकारच नाही. कारण काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरच आहे. मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्यामागे काँग्रेसचं कारस्थान होतं. काँग्रेसमुळेच माझ्यावर दहशतवादाचे आरोप लागले. एनआयएने आपल्याला क्लिनचीट दिल्याचंही साध्वींनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.