कॉंग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्‍मीरमध्ये एकत्र

श्रीनगर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्‍मीर राज्याकरता कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात आघाडी झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी आघाडी झाल्याची माहिती दिली आहे.

जम्मू आणि उधमपूर मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार उभा राहणार आहे. तर श्रीनगरमधून मी निवडणूक लढविणार आहे. अनंतनाग आणि बारामुल्ला तसेच लडाख मतदारसंघात दोन्ही पक्षांदरम्यान मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले आहे.

या तिन्ही मतदारसंघांमध्ये गळेकापू स्पर्धा नसेल. आमच्यापैकी कुठलाही पक्ष विजयी झाला तरीही लाभ दोघांचाच होणार असल्याचा दावा कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. नॅशनल कॉन्फरन्स तसेच कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी अनंतनाग मतदारसंघावर दावा केल्याने त्यांच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण मैत्रिपूर्ण लढतीचा मार्ग स्वीकारत दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली आहे. 2014 च्या निवडणुकीत जम्मू-काश्‍मीरच्या 6 जागांपैकी 3 ठिकाणी भाजप तर 3 ठिकाणी पीडीपीने विजय मिळविला होता. जम्मू क्षेत्रात भाजप तर काश्‍मीर खोऱयात पीडीपीने वर्चस्व मिळविले होते. यंदाही जम्मू तसेच लडाख क्षेत्रात भाजपला पाठिंबा मिळण्याची शक्‍यता वर्तविली
जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)