तामीळनाडूतील कॉंग्रेस खासदाराचे करोना संसर्गाने निधन

चेन्नई -तामीळनाडूतील कॉंग्रेसचे खासदार एच.वसंथकुमार यांचे शुक्रवारी करोना संसर्गामुळे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. करोनाविषयक चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वसंथकुमार यांना 10 ऑगस्टला येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

उद्योजक असणारे वसंथकुमार दोनवेळा तामीळनाडू विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर मागील वर्षीच्या निवडणुकीत ते प्रथमच लोकसभेवर निवडून गेले. लोकसभेत ते कन्याकुमारी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तामीळनाडूतील कॉंग्रेसच्या वजनदार नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची धुराही सांभाळली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी वसंथकुमार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.