नवी दिल्ली – राज्यसभा खासदार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पटेल यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.
पटेल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांना स्वतःला आयसोलेट करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, मंगळवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबतची त्यांनी स्वतः ट्वीट करुन माहिती दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू होम क्वारन्टीन झाले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी उषा नायडू यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला होता.