अहमदाबाद – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात कॉंग्रेसने विद्यमान आमदार सी. जे. चावडा यांना गांधीनगर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. चावडा हे गांधीनगर उत्तर मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आपण अमित शहा यांना कडवी झुंज देऊ असा विश्वास चावडा यांनी व्यक्त केल आहे.
काल कॉंग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या खेरीज पाटीदार अमानत आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या सहकारी गीता पटेल यांना कॉंग्रेसने अहमदाबाद पुर्व मतदार संघातील उमेदवारी जाहीर केली आहे. स्वता हार्दिक पटेल यांना जामनगर मतदार संघातून उमेदवारी अपेक्षीत होती पण त्यांच्या कोर्ट केसेस प्रकरणामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याने त्यांच्या जागी कॉंग्रेसने मुरूभाई कंडोरिया यांना उमेदवारी दिली आहे.