नाशिक – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राज्यातील सर्व काँग्रेस नेते या यात्रेत सामील होताहेत. अशात एका काँग्रेस आमदाराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये आमदार आपल्या कार्यकर्त्यांसाठी थेट कोयत्याने केक कापताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा हा व्हायरल व्हिडीओ आहे. ज्यामध्ये आमदार स्वतः केक कापताना दिसत आहेत. खोसकर हे नाशिकमधील इगतपुरीच्या नेतृत्व करतात. नुकतंच आपल्या एका जवळच्या कार्यकर्त्याच्या जन्मदिवसानिमित्त केक कापण्यासाठी आमदार पोहचले होते. यावेळेसचा त्यांचा कोयत्याने केक कापतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, तर दुसरीकडे काँग्रेस आमदाराचा चक्क कोयत्याने केक कापून बर्थडे साजरा #BharatJodaYatra #MaharashtraPolitics pic.twitter.com/ExxTOV3Gxt
— Siddhesh Sawant (@ssidsawant) November 9, 2022
एका कार्यकर्त्याने आपल्या सोशल मीडियावरून हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यावेळी आमदारांसोबत इतर पक्षाचे पदाधिकारी देखील असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील यावेळी झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.