कोल्हापूर – काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आहे. आमदार जाधव गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याकारणाने त्यांच्यावर हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची रुग्णालयात प्राणज्योत मालावली. मृत्यूसमई ते 57 वर्षाचे होते. जाधव यांच्या अकाली जाण्याने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आमदार जाधव यांना दोन वेळा करोना होऊन गेला करोनावर त्यांनी यशस्वी मात सुद्धा केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्रास होत असल्यामुळे उपचासाठी हैद्राबाद येथे दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली.
आमदार चंद्रकांत जाधव हे पहिल्यांदा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदास संघातून निवडणूक आले होते. त्यांच्या अशा जाण्याने कोल्हापूर कॉंग्रेसचे भरून न निघणारे नुकासान झाले आहे.