नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराबाबत काँग्रेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दिल्ली हिंसाचाराबाबत त्यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना निवेदन दिले. त्यांच्या समवेत माजी पंतप्रधान मनमोहन शिंग यांची देखील उपस्थिती होती.
Delhi: Congress interim president Sonia Gandhi, former Prime Minister Dr. Manmohan Singh, and other party leaders reach Rashtrapati Bhavan to submit a memorandum to the President on #DelhiViolence. pic.twitter.com/q1SjGuAwf5
— ANI (@ANI) February 27, 2020
दरम्यान दिल्ली हिंसाचारावरून बुधवारी कॉंग्रेसने शांतता मोर्चा काढला होता. कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांचा मोर्चा गांधी स्मृतीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना जनपथ रोडवर रोखले.
दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असून ,गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.