#लोकसभा2019 : कॉंग्रेसचा जाहीरनामा पुढील आठवड्यात

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, 2 एप्रिल रोजी कॉंग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे.

बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुख्यत्वे भर देत कॉंग्रेसच्या सर्व प्रक्‍त्यांनी चर्चेत हे दोन्ही मुद्दे मांडावे अशा स्पष्ट सूचना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्या आहेत. या सूचेननुसार जाहीरनामा जारी होण्याआधीच कॉंग्रेस बेरोजगारीच्या मुद्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधत आहे.

मोदी यांना रोजगार विनाशक पंतप्रधान, असे संबोधत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेशा यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. 2018 मध्ये मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे एक कोटी नोकऱ्या गायब झाल्या. सरकारी आकडेवारी सादर करून मुद्रा योजनेतहत रोजगार निर्माण झाल्याचा मोदी यांचा दावाही दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

2017-18 मध्ये मुद्रा योजनेतहत 24,840 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. एवढ्या कमी रकमेत कोणता व्यवसाय सुरू करता येतो. यातून एकही रोजगार निर्माण होऊ शकत नाही. दोन टक्के कर्ज पाच लाखांचे होते. मुद्रा योजनेचे तीन वर्ग आहेत. यात शिशू, किशोर आणि तरुण वर्गाचा समावेश आहे. शिशू योजनेतहत देण्यात आलेल्या 88 टक्के कर्जाची रक्कम 2,48,40 रुपये होती. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार आकडेवारी लपवीत आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यास सरकारचा फोलपणा उघड होईल असा दावा त्यानी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.