नवी दिल्ली – कर्नाटकमधील भाजप नेते आणि जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर एका युवतीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजानीमा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे मंत्री जारकीहोळी यांचा युवतीसोबतचा अश्लील व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. या मुद्यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करत खोचक टीका केली आहे.
काँग्रेस ने कर्नाटकाला IT Hub बनवले…
भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे..!!#rameshjarakiholi
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) March 6, 2021
काय म्हणाले भाई जगताप
‘काँग्रेसने कर्नाटकाला IT Hub बनवले. भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे..!!’, असं जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटकची ओळख आयटी हब अशी आहे. कर्नाटकची ही ओळख आणि भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण यावरून जगताप यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.