नवी दिल्ली – काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार उदित राज यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उदित राज यांनी विराट कोहलीला अनुष्का शर्माचा कुत्रा म्हटले आहे. या वक्तव्याबद्दल सोशल मिडीयावर उदित राज यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.
उदित राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अनुष्काने तिचा कुत्रा विराट कोहलीची काळजी घेण्याची गरज नाही. कुत्र्यापेक्षा कुणीही विश्वासू नाही. कोहलीने तुमच्यासारख्या लुटारू, मुर्खांना शिकवले आहे की मानवतेला प्रदूषणाचा धोका आहे. तुम्ही येथील रहिवाशी आहात की नाही तपासण्यासाठी तुमचा डीएनए तपासावा लागेल, असे ट्विट उदित राज यांनी केले आहे.
दरम्यान, विराट कोहलीने एक व्हिडीओ ट्विट करत देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडू नयेत असे नागरिकांना आवाहन केले होते. याउलट दिल्लीसह देशभरात पटाके फोडण्यात आले. त्याचवेळी दिल्लीतील बऱ्याच ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स 999 वर पोहोचला.
त्याचबरोबर विराटच्या या ट्विटनंतर त्याला ट्विटरवर #Anushka_Apana_Kutta_Sambhal या नावाने ट्रोल केले जाऊ लागले. यावर उदित राज यांनी प्रतिक्रिया देत विराट कोहलीला पाठिंबा दर्शविला. मात्र, त्यांनी ट्विटमध्ये वापरलेल्या भाषेबद्दल त्यांच्यावर टीका केली जात आहे.