सोलापूर : कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने खळबळ माजली आहे. रेश्मा यांनी महिनाभरापूर्वी सोलापुरातील एमआयएम नगरसेवक तौफीक शेख यांच्याविरोधात सादर बाजार पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. तेव्हापासून रेश्मा बेपत्ता होत्या. अखेर त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय.
विजयपूरजवळ असलेल्या कोलार गावात रेश्मा यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून विजयपूरमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तापस चालू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, रेश्मा पडकेनूर यांची हत्या कोणी आणि का केली, हे अद्याप अस्पष्ट आहे.
Karnataka: Congress leader Reshma Padekanura, who was also a former Vijayapura district president of JD(S), was found dead near Kolhar of Vijayapura earlier today pic.twitter.com/Cj4IJpqTcf
— ANI (@ANI) May 17, 2019