नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची 10 महिने शिक्षा भोगल्यानंतर पटियाला तुरुंगातून आज सुटका करण्यात आली आहे. रोड रेज प्रकरणी त्यांना एक वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना 2 महिने आधीच तुरुंगातून सोडण्यात आले.
तुरुंगातून बाहेर आल्यावर सिद्धू म्हणाले, आजच्या काळात काही क्रांती होत असेल तर त्याचे नाव राहुल गांधी आहे. देशात जेव्हा-जेव्हा हुकूमशाही आली आहे, तेव्हा क्रांतीही आली. यावेळी क्रांतीचे नाव राहुल गांधी आहे.
केंद्र सरकारकडून लोकशाहीवर बेड्या लादण्याचे प्रयत्न सुरू असून पंजाब देशाची ढाल आणि या बेड्या तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाबला कमकुवत करणारे स्वत: कमजोर होतील आणि यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचे सिद्धू यांनी सांगितले.