नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोतीलाल वोरा (Motilal Vora) यांचे सोमवारी (21 डिसेंबर) निधन झाले. दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान वयाच्या 93 व्या वर्षी मोतीलाल वोरा यांनी शेवटचा श्वास घेतला. ( Congress leader Moti Lal Vohra passes away )
Congress leader Moti Lal Vohra (file photo) passes away at Fortis Escort Hospital in Delhi at the age of 93 pic.twitter.com/pCR8QHwXkh
— ANI (@ANI) December 21, 2020
कालचं (20 डिसेंबर) त्याचा वाढदिवस होता. अधिक काळातपर्यंत काँग्रेसचे कोषाध्यक्ष असलेले मोतीलाल वोरा हे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते.यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता. वोरा यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या देशपातळीवरील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.