कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, नेतेमंडळी काही ना काही कारणांनी ‘वर्षा’वर फेऱ्या मारत आहेत. निवडणूकीच्या तोंडावर याची अधिक चर्चा होत आहे. यातच कॉंग्रेसचे पुणे जिल्ह्यातील नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “वर्षा’ निवासस्थनी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभेत 1995पासून इंदापूरचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाटील यांनी विधिमंडळातील कामाचा अनुभव “विधानगाथा’ या पुस्तकाच्या निमित्ताने शब्दबध्द केला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले.

हर्षवर्धन यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील व कन्या अंकिता पाटील यांनीही भेट घेतली. अंकिता या जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी दोन्ही कॉंग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीत इंदापूरची जागा निर्णायक आहे. कॉंग्रेसने इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, राष्ट्रवादीने या मागणीवर अजून निर्णय घेतलेला नाही. यापार्श्वभूमीवर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन इंदापूरच्या जागेसाठी पक्षावर दबाव वाढवल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.