नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. सध्या ते आपल्या घरातच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत.
I have tested positive for COVID-19. I am in home quarantine. Those who came in contact with me in last few days may kindly follow the protocol.
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) October 16, 2020
गुलाम नबी आझाद यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, माझी कोविड-19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. मी घरातच विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
दरम्यान, याआधीही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल बोरा, अभिषेक मनु सिंघवी, तरुण गोगोई आणि आरपीएन सिंग यांच्यासह इतर काही कॉंग्रेस नेत्यांना कोरोना संसर्ग झाला आहे आणि ते बरे देखील झाले आहेत.