CK Ravichandran | कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका काँग्रेस नेत्याचे पत्रकार परिषदेदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यादरम्यान कुरुपा समुदाय संघाचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते सी. के. रविचंद्रन प्रेस क्लबमध्ये अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ बेंगळुरू प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रविचंद्रन प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माईकवर बोलत असताना काँग्रेस नेते रविचंद्रन अचानक खुर्चीवरून खाली पडले आणि बेशुद्ध झाले. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या बंगळुरुमधील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
CK Ravichandran, @INCKarnataka, Karnataka Backward Classes & Minorities Assn member died of cardiac arrest while addressing press conference at Press Club #Bengaluru opposing #Karnataka Guv @TCGEHLOT’s permission to prosecute CM @siddaramaiah. @TOIBengaluru #Health pic.twitter.com/zkCjdi5uma
— Niranjan Kaggere (@nkaggere) August 19, 2024
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले दुःख
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या घटनेबाबत एक्स पोस्टवरुन दुःख व्यक्त केलं. “संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात आमचे साथीदार असलेले रविचंद्रन यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करतो. त्यांच्या दु:खाच्या वेळी मी त्यांचे कुटुंबीयांसोबत आहे,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. CK Ravichandran |
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आरोप काय?
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) कडून पर्यायी जागा वाटप करताना अनियमितता केल्याच्या आरोपावरून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली होती. मात्र राज्यपालांच्या आदेशाविरोधात सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा दिला असून पुढील आदेशापर्यंत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे. CK Ravichandran |
हेही वाचा:
Paris Paralympics 2024 (Javelin Throw) : नवीन विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकण्याचे ध्येय – सुमित अंतिल