‘मास्टर’ असा उल्लेख करत काँग्रेस गटनेत्यांकडून मोदी-शहांची फिरकी

नवी दिल्ली : देशभरामध्ये सध्या नॅशनल रजिस्ट्रर ऑफ सिटीझन्स (NRC), व सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट (CAA) या मुद्द्यांवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. देशभरामध्ये या कायद्यांच्या विरोधात व समर्थनात विविध राजकीय पक्षांतर्फे आंदोलने सुरु असून काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान देशभरामध्ये वाढीस लागलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील रामलीला मैदानावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तूर्तास एनआरसी लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पंतप्रधानांच्या याच वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना ‘बनवाबनवीचे मास्टर’ अशी उपाधी बहाल केली आहे.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले असून चौधरी यांनी मोदी-शहा यांच्यावर टीकास्त्र डागताना, “पंतप्रधान मोदी अशा प्रकारे बोलतात जसे की त्यांना एनआरसी बाबत काहीही माहिती नाही मात्र दुसरीकडे त्यांच्या सरकारमधील गृहमंत्री अमित शाह देशभरामध्ये एनआरसी लागू करणार असल्याचे लोकसभेत सांगतात. मोदी-शहा यांची जोडगोळी नक्की काय म्हणतेय व काय नाही याकडे आपण सर्वांना बारकाईने लक्ष्य देण्याची गरज आहे कारण हे दोघेही बनवाबनवी करण्यात मास्टर आहेत.” असं वक्तव्य केलं आहे.

Adhir R Chowdhury, Congress: Modi ji talks as if he has never heard of NRC but his Home Minister said in Parliament that NRC will be implemented in entire country…Ye Ramu aur Shyamu kya kehte hain, kya nahi kehte hain ispe humko dhyan dena padega kyunki ye gumrah ke master hain pic.twitter.com/4UwjQPqGoT

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.