‘काँग्रेस – जेडीएस नेत्यांपासून आमच्या जीवाला धोका’

मुंबई – ‘कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीचे बडे नेते डी के शिवकुमार आणि मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे.’ असे पत्र राजीनामे दिलेले कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएसच्या १० आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहिले आहे. यामुळे राजकीय खलबते सुरु आहे.

दरम्यान, राजीनामे दिलेले बंडखोर आमदार सध्या मुंबईच्या रेनसॉंस हॉटेलमध्ये असून त्यांच्या मनधरणीसाठी कॉंगेसचे नेते शिवकुमार रेनसॉंस हॉटेलकडे धाव घेतली होती. मात्र, त्यांना  पोलिसांकडून हॉटेलच्या बाहेरच थांबवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.  या सर्व गोंधळात बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी ‘कुमारस्वामी गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष हा नेमका कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.