दोन दिवसात उत्तर दिलं नाही तर…

सचिन पायलट यांच्यासह १८ सदस्यांना काँग्रेसकडून नोटीस

जयपूर – कॉंग्रेसने पंख छाटल्यानंतर राजस्थानमधील तरूण नेते सचिन पालयट कुठले पाऊल उचलणार याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. ते उद्या (बुधवार) पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा आहे.

पायलट यांनी बंडाचा पवित्रा स्वीकारल्याने राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याबाबत पायलट यांच्या गोटातून अद्याप मौनच बाळगण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर  राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी  अविनाश पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की,’ “सचिन पायलट आणि इतर १८ सदस्यांना विधिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. जर त्यांनी दोन दिवसांत उत्तर दिलं नाही तर विधिमंडळ पक्षातून आपलं सदस्यत्व रद्द करत आहेत असं समजलं जाईल”.असं ही ते म्हणाले आहे.

ते पुढे म्हणाले,“देव सचिन पायलट यांना शहापपणा देवो, आणि त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांना आपली चूक मान्य करावी. सचिन पायलट यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे नेहमी खुले होते, आजही आहेत. पण आता गोष्टी फार पुढे गेल्या आहेत. आता त्यांचा काही फायदा होणार नाही,”

Leave A Reply

Your email address will not be published.