कलम 370 बाबत कॉंग्रेस अफवा पसरवत आहे

मोदींचा कॉंग्रेसवर आरोप
चरखी दादरी: कलम 370 च्या निर्णयाबाबत कॉंग्रेस पक्ष देशात आणि परदेशात अफवा पसरवत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज हरियानातील एका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हरियानात स्वच्छ आणि पारदर्शक सरकार दिले असून त्या सरकारच्या कामावर यावेळी राज्यातील जनता शिक्कामोर्तब करेल आणि भाजपलाच पुन्हा सत्ता देईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मोदींनी काश्‍मीरातील कलम 370 च्या निर्णयाचाहीं दाखला देत तेथील जनतेच्या मनात असलेली दहशत संपवण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केला असा दावा केला आहे.

या दादरी मतदार संघातून भाजपच्या उमेदवार म्हणून कुस्तीगीर बबिता फोगट या निवडणूक लढवत आहेत. त्यांचा उल्लेख हरियानाची कन्या असा करून मोदींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. बबिता फोगट आणि फोगट परिवाराच्या कामगिरीवर दंगल हा सिनेमा प्रकाशित झाला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपली जेव्हा अनौपचारीक चर्चा झाली त्यावेळी आपण हा दंगल सिनेमा पाहिल्याचे जिनपिंग यांनी आपल्याला सांगितल्याचे मोदींनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.