दिल्ली – दिल्लीतील राजभवनामध्ये आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित ५२ खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या संसदीय नेते पदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली असून १७ जूनपासून सुरु होणाऱ्या संसदीय अधिवेशनाबाबतीतील मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसतर्फे देशभरातील आपल्या लोकसभा उमेदवारांना मतदान करणाऱ्या १२ कोटी उमेदवारांचे आभार देखील मानण्यात आले.
या बैठकीला उपस्थित असणाऱ्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या शब्दांद्वारे त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपल्या खासदारांना उद्देशून म्हंटले की, “इथून पुढील कालावधीमध्ये देशामध्ये एकही संस्था अशी असणार नाही जी तुम्हाला मदत करेल, कोणतीही संस्था तुम्हाला मदत करणार नाही. ही परिस्थिती भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे सरकार होते तशी असेल. मात्र जेव्हा आपल्याला ब्रिटिशकाळामध्ये एकाही संस्थेने सहकार्य केलं नव्हतं तेव्हा देखील आपण त्यांच्याविरोधात लढून जिंकलो होतो आणि आता त्याचीच पुनरावृत्ती करायची आहे. आपण हे करण्यात यशस्वी होऊ!.”
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारणी समितीला सोपवला आहे. काँग्रेस कार्यकारणीने राहुल गांधी यांचा राजीनामा एक मुखाने नाकारला असून राहुल गांधी हेच काँग्रेस अध्यक्ष पदासाठी लायक उमेदवार आहेत अशी भूमिका काँग्रेस कार्यकारणीने घेतली आहे.
Congress Pres Rahul Gandhi in CPP meeting,earlier today: There's no institution that is going to support you in this country, not one is going to support you. It's like the British period, when not a single institution supported the party yet we fought & won, we will do it again. pic.twitter.com/WoWzlAMPEM
— ANI (@ANI) June 1, 2019