कॉंग्रेस हातमिळवणी करण्यायोग्य पक्ष नाही – कुमारस्वामी

कॉंग्रेसकडून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न

बंगळूर – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कॉंग्रेस हातमिळवणी करण्यायोग्य पक्ष नाही. तो पक्ष आघाडी धर्माचे पालन करत नाही, असे त्यांनी म्हटले.

कर्नाटक विधानसभेच्या 2 जागांसाठी पुढील महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे. त्या पोटनिवडणुकीसाठी जेडीएसशी हातमिळवणी केली जाणार नसल्याचे कॉंग्रेसने जाहीर केले. त्यावरून जेडीएसचे नेते असणाऱ्या कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसवर पलटवार केला. कॉंग्रेसशी आघाडी करण्याचा कुठलाही प्रस्ताव जेडीएसकडून देण्यात आला नाही.

कर्नाटकात 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने जेडीएसचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांचे दार ठोठावले. तसे आम्ही कॉंग्रेसच्या दारावर गेलेलो नाही. कॉंग्रेस पक्ष आघाडी करण्यायोग्य नसल्याचे कर्नाटकमधील घडामोडींवरून दिसून आले. त्या पक्षाने राजस्थानात बसपचे आमदार जाळ्यात ओढले.

महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसकडून होत आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कर्नाटकात निवडणुकीनंतर जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र, सत्तारूढ आघाडीतील बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील ते सरकार मागील वर्षी कोसळले. त्यानंतर कॉंग्रेस आणि जेडीएसमध्ये दुरावा निर्माण झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.