मुस्लीम लीगच्या व्हायरसने कॉंग्रेस संक्रमित – योगी आदित्यनाथ

लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आता मुस्लीम लीगच्या आडून कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगला व्हायरस संबोधले आहे. “या व्हायरसने कॉंग्रेस संक्रमित झाली आहे’, असे म्हणत आदित्यनाथांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

आदित्यनाथ यांनी एका ट्‌वीटमध्ये म्हटले आहे की, मुस्लीम लीग एक व्हायरस आहे. हा असा व्हायरस असून यापासून कोणीही वाचू शकलेला नाही. आज मुख्य विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस या व्हायरसने संक्रमित झाला आहे. विचार करा जर कॉंग्रेस पक्ष या निवडणुकीत जिंकला तर काय होईल? ते जिंकले तर हा व्हायरस संपूर्ण देशभर पसरेल.

योगींनी त्यानंतर अजून एक ट्‌वीट करुन म्हटले आहे की, “1857च्या स्वातंत्र्य संग्रामावेळी संपूर्ण देश क्रांतीकारक मंगल पांडे यांच्यासोबत इंग्रजांविरोधात उभा ठाकला होता. त्यानंतर हा मुस्लीम लीग नावाचा व्हायरस आला आणि संपूर्ण देशभर पसरला. या व्हायरसमुळे देशाची फाळणी झाली. आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा हिरवे झेंडे फडकू लागले आहेत. कॉंग्रेस पक्ष या व्हायरसने संक्रमित झाला आहे. सावधान राहा!, असे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.