….तर मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले नसते

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे संतापजनक वक्‍तव्य

भोपाळ : जर भाजपाने मनात आणले असते तर राज्यात कॉंग्रेसला सरकार स्थापन करता आले नसते असे संतापजनक वक्‍तव्य मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.मागील आठवड्यात राज्यात एका विधेयकाच्या चर्चेदरम्यान दोन भाजपा आमदारांनी कॉंग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांचा पारा सध्या चढला आहे.

भाजपाच्या नेत्यांकडून पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली त्यात ते बोलत होते. यावेळी बोलतान शिवराज सिंह चौहान पत्रकारांशी बोलले की, जर आम्ही मनात आणलं असतं तर राज्यात कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यात आले नसते. कॉंग्रेसने सपा आणि बसपा यांच्या मदतीने मध्य प्रदेशात सरकार बनवले आहे. भाजपाला कॉंग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी सांगितले असतानाही आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नाही. आम्ही विरोधी पक्षात बसणे पसंत केले. राज्यात कॉंग्रेस सरकार आल्यापासून भ्रष्ट कारभाराशिवाय काहीच केले नाही. आम्ही कधी त्या सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही पण कॉंग्रेसने जो खेळ सुरु केला आहे तो मी संपवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)