राजकारणात काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘राजकरणात काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली असल्याचा खोचक टोला काँग्रेसवर लगावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील पत्रकार परिषेदत बोलताना मुनगंटीवार म्हटले की, ‘कॉंग्रेसला राज्यात अपयशाचे ग्रहण लागले असून कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजप पक्षात प्रवेश करताना लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आले होते. राजकरणात काँग्रेसची ‘एक्सपायरी डेट’ संपल्यामुळे काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसचा हात सोडला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.