नवी दिल्ली -करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 2 एप्रिलला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ती बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे. त्या पाऊलामुळे होणाऱ्या परिणामांवर कार्यकारिणी बैठकीत कॉंग्रेसचे प्रमुख नेते चर्चा करतील.
करोनाविरोधी लढ्यात सरकारच्या पाठिशी उभे राहण्याची ग्वाही कॉंग्रेसने दिली आहे. त्याचवेळी लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या स्थितीच्या हाताळणीवरून त्या पक्षाकडून सरकारवर टीका केली जात आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गरिबांना आणि मजुरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याकडे कॉंग्रेस लक्ष वेधत आहे. संपूर्ण लॉकडाऊनऐवजी इतर उपाययोजनांचा विचार व्हावा, असेही त्या पक्षाकडून सुचवले जात आहे.