काँग्रेसने येडियुरप्पा यांच्यावर केलेले आरोप गांभीर्याने घेण्याची गरज नाही – नितीन गडकरी

नागपूर – कांग्रेसने येडियुरप्पा यांच्यावर केलेले आरोप हे बालिशपणाचे असल्याचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. आयकर विभागाने पूर्वीच याची चौकशी केली असून काँग्रेसने घाणेरडे राजकारण करत खोटी स्वाक्षरी करून कागद तयार केले आहेत. त्यामुळे हे आरोप गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

आयकर खात्याने कर्नाटकातील भाजप नेते येडियुरप्पा यांच्यावर घातलेल्या छाप्याच्यावेळी त्यांची एक डायरी आयकर खात्याला सापडली असून त्यात येडियुरप्पा यांनी केंद्रातील भाजप नेत्यांना तब्बल 1800 कोटी रूपये दिल्याच्या नोंदी स्वत: येडियुरप्पा यांनी आपल्या हाताने केल्या असल्याचे वृत्त द कारवान नावाच्या एका नियतकालिकाने दिले आहे. त्याचा आधार घेत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण खरे आहे की खोटे ते पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली असून या प्रकरणी लोकपालांकडेही दाद मागितली जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान येडियुरप्पा यांनी हे आरोप फेटाळून लावले असून. मोदींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच कॉंग्रेस बावचळली असून त्यांनी हा खोडसाळ प्रचार सुरू केला आहे असे येडियुप्पांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)