कॉंग्रेसचा डीएनएच भ्रष्टाचाराचा – भाजपचे नेते नक्वी यांचा आरोप

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचा डीएनएच भ्रष्टाचाराचा आहे. त्यांनी नेहमीच दारिद्य्राचे भांडवल केले आहे असा आरोप भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे. उत्तरप्रदेशातील रामपुर येथील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी कॉंग्रेसच्या किमान वेतन योजनेवर टीका केली.

या मतदार संघात भाजपने यंदा समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारार्थ ते येथे आले होते. सपा-बसपा आणि क्रॉंगेस यांनी महाआघाडी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची ही महाआघाडी म्हणजे गुन्हेगारांची आघाडी आहे असा आरोप त्यांनी केला.

कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्याद्वारे अवाच्यासव्वा घोषणा केल्या आहेत. त्यांनी अशा कितीही घोषणा केल्या तरी लोक त्यांना मतदान करणार नाहीत असा दावाही त्यांनी केला. इतकी वर्ष सत्ता भोगूनही कॉंग्रेसने गरीबांसाठी काहीही केले नाही असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.